गुरूवार, 11 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

गांधीबाधा हा देशाला झालेला रोग - संभाजी भिडे

Sambhaji Bhide - a disease of the country
"देशातील इंग्रजांचे राज्य घालवण्यासाठी क्रांतिकारकांनी आयुष्याचा उदंड होम केला. परंतु आमच्या देशाला स्वातंत्र्य 'पूज्य' महात्मा गांधीजींच्या नेतृत्वामुळे मिळाले. हा 'गांधीबाधा' देशाला लागलेला रोग आहे," असं वक्तव्यं  शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांनी केलं आहे.  
 
म्लेंच्छ बाधा, आंग्ल बाधा आणि गांधीबाधा नामशेष करणारा मंत्र शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आहे, असंही भिडे यांनी म्हटलं.
 
शिवप्रतिष्ठानच्या वतीनं CAA आणि NRC च्या समर्थनार्थ सांगलीत मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते.
 
त्यांनी म्हटलं, "CAA आणि NRC कायदा देशहिताचा आहे. कायद्याला विरोध करणारे देशद्रोही आणि इरसाल आहेत. हिंदू माणसाला आत्मोद्धार कळतो, पण राष्ट्रोद्धार कळत नाही. व्यक्तिगत पातळीवर जगात तोड मिळणार नाही, इतका हिंदू माणूस चांगला आहे. पण, राष्ट्र, समाज आणि धार्मिक पातळीवर तो पराभूत झालेला आहे."