शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 30 डिसेंबर 2019 (11:52 IST)

देशातल्या 100 रेल्वेमार्गांवर 150 खासगी रेल्वे धावणार

भारतातील 100 रेल्वेमार्गांवर लवकरच 150 खासगी रेल्वे धावतील. त्यासाठी पुढील महिन्यात निविदा मागवल्या जातील.  
 
केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अप्रेझल कमिटीनं (PPPAC) खासगी रेल्वेच्या प्रकल्पाला तत्वत: मान्यता दिली आहे. त्यामुळं आता देशात खासगी रेल्वेगाड्या धावण्याचा मार्ग मोकळा झालाय.
 
मुंबई -कोलकाता, मुंबई-चेन्नई, मुंबई-गुवाहाटी, नवी दिल्ली-मुंबई, तिरुअनंतपुरम-गुवाहाटी अशा लांब पल्ल्याच्या मार्गांवर खासगी रेल्वेगाड्यांचा प्रयोग केला जाणार आहे.