शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 30 डिसेंबर 2019 (11:46 IST)

NRC, CAA लोकांपर्यंत पोहोचवण्यात सरकार कमी पडलं - प्रकाश जावडेकर

नागरिकत्व दुरुस्ती कायद (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) बाबत योग्य संदेश पोहोचवण्यात सरकार कमी पडलं, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलंय.  
 
यावेळी प्रकाश जावडेकर यांनी CAA आणि NRC बाबत शिवसेनेनं घेतलेल्या भूमिकेवरही टीका केली.
 
काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्यावर शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांना 'हिंदूहृदयसम्राट' म्हणत नाही आणि त्यांचे विचारही ते विसरले आहेत, असा आरोप जावडेकरांनी केलाय.
 
"बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे निर्वासीतांना शरण देऊ आणि घुसखोरांना हाकलून देऊ. पण शिवसेनेने सध्या आपली भूमिका बदलली आहे," असं जावडेकर म्हणाले.