शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 30 डिसेंबर 2019 (11:50 IST)

हेमंत सोरेन यांचा पहिला निर्णय - पत्थलगडी आंदोलकांवरील गुन्हे मागे

झारखंडचे नवे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत पत्थलगडी आंदोलकांना दिलासा दिलाय. आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे त्यांनी मागे घेतले आहेत.  
 
रघुबर दास यांच्या कार्यकाळात छोटानागपूर आणि संथाल परगना येथे मोठं आंदोलन झालं होतं. यावेळी आदिवासींनी मोठ्या मोठ्या दगडांवर राज्यघटनेनं दिलेल्या अधिकारांचं लेखन करून, ठिकठिकाणी हे दगड ठेवले होते. कालांतरानं हे आंदोलन हिंसकही झालं होतं.
 
आदिवासी आणि पोलिसांमध्ये मोठा संघर्ष झाला होता. आंदोलनात सहभागी झालेल्यांवर तत्कालीन झारखंड सरकरानं गुन्हे दाखल केले होते. यामध्ये 121 ए आणि 124 ए अन्वये अनेक गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे सर्व गुन्हे हेमंत सोरेन यांनी मागे घेतले आहेत.