शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 2 जानेवारी 2020 (09:29 IST)

नवीन वर्षात 12 राज्यांमध्ये 'एक देश, एक रेशन कार्ड' योजना सुरू

देशातील 12 राज्यांमध्ये 1 जानेवारी 2020 पासून 'एक देश, एक रेशन कार्ड' ही योजना सुरू झाली आहे. केंद्रीय अन्न आणि पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी यासंबंधी घोषणा केली आहे.  
 
 जून 2020 पर्यंत ही योजना सर्व राज्यांमध्ये अंमलात आणली जाईल, असंही रामविलास पासवान यांनी सांगितलं.
 
दरम्यान,'एक देश, एक रेशन कार्ड' ही योजना बायोमॅट्रिक आधारवर अवलंबून आहे. कामगार आणि दुर्बल घटकातील लोकांना या योजनेचा फायदा होईल, असं पासवान यांनी म्हटलं.