बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 2 जानेवारी 2020 (09:25 IST)

शिवसेनेचा आदेश आता दिल्लीच्या 'मातोश्रीं'वर अवलंबून-देवेंद्र फडणवीस

शिवसेनेचा आदेश पूर्वी मातोश्रीवरून यायचा. आता शिवसेनेची भूमिका दिल्लीच्या मातोश्रींवर अवलंबून आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका झाली तरी हे सरकार निमूटपणे पाहत राहिलं. या सगळ्यांत शिवसेनेची भूमिका बदलत आहे, असंही फडणवीस यांनी म्हटलं.  
 
पालघर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रचारासाठी फडणवीसांनी डहाणूमध्ये सभा घेतली. काँग्रेस, राष्ट्रवादीला बरोबर घेऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री करू असे वचन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिलं होतं का, असा सवाल फडणवीस यांनी डहाणूतील या सभेत केला.
 
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या सरकारने मदत केली नाही. सरसकट कर्जमाफीचं आश्वासनही पाळलं नाही. शेतकऱ्यांची फसवणूक करत या सरकारने कामाला सुरुवात केल्याचा आरोप फडणवीसांनी केला.