शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 2 जानेवारी 2020 (09:23 IST)

देवेंद्र फडणवीस-महाजनांनी माझं राजकारण संपविण्याचा डाव आखला-एकनाथ खडसे

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी मला तिकीट मिळू न देऊन जाणीवपूर्वक आपलं राजकारण संपविण्याचा डाव आखल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.  
 
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीस यांनी आपल्याविषयी नाराजी व्यक्त केल्यामुळेच आपल्याला तिकीट नाकारण्यात आल्याची माहिती कोअर कमिटीमधल्या आपल्या जवळच्या मित्रांनी दिल्याचंही खडसे यांनी म्हटलं आहे.
 
जेपी नड्डांना मी याबद्दल सविस्तर माहिती दिली असून माझ्यावर झालेल्या अन्यायाची दखल घेण्याचं आश्वासन त्यांनी दिलं असल्याचंही खडसेंनी या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं. अर्थात, या भेटीवर फारसं समाधानी नसल्याचंही त्यांनी सांगितलं. मात्र, आपण भाजप सोडून कोठे जाणार नसल्याचंही खडसेंनी म्हटलं आहे.