शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 30 डिसेंबर 2019 (08:26 IST)

देशातील 54% पदवीधर नोकरीस अपात्र - AICTE

देशातील केवळ 46% तरुण हे पदवीनंतर नोकरीस पात्र असतात, असा अहवाल सरकारी यंत्रणा असलेल्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेनं (AICTE) जाहीर केला आहे.  
 
AICTEच्या 'इंडिया स्किल्स रिपोर्ट 2019-20'मध्ये ही बाब समोर आली आहे.
 
या अहवालानुसार, आंध्रप्रदेश हे सर्वाधिक रोजगार निर्माण करणारं राज्य आहे. तर महाराष्ट्र सर्वाधिक रोजगार देणाऱ्या राज्यांच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे. मुंबई हे सर्वाधिक रोजगार देणारं शहर ठरलं आहे. त्याखालोखाल हैदराबाद, बंगळुरू, नवी दिल्ली, पुणे, लखनऊ या शहरांचा क्रमांक लागतो.
 
देशात वर्षाला लाखो विद्यार्थी पदवी शिक्षण पूर्ण करत असतात. मात्र ते पदवीधर झाले, तरी त्यांच्यात नोकरीसाठी आवश्यक कौशल्यांचा अभाव असल्यामुळे ते नोकरीस पात्र ठरत नाहीत. अशा तरुणांची संख्या तब्बल 54 टक्के इतकी आहे, असंही या अहवालात म्हटलंय.