शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

आदित्य ठाकरे: सत्ता गेलेल्यांनी बरनॉल घ्यावं, असंही सांगणार नाही

"ज्यांची सत्ता गेली आहे त्यांना वाईट वाटणारच. मात्र, त्यांनी बरनॉल घ्यावं, असं मी सांगणार नाही," असं मत शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.  
 
मुंबईतल्या वरळी इथं झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्यावतीन झोपडपट्टीधारकांना घरे वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात आदित्य ठाकरे बोलत होते.
 
त्यांनी म्हटलं, "ज्यांनी जनतेला दिलेली वचनं पाळली नाहीत त्यामुळे ते आज सत्तेत नाहीत. सत्ता गेलेल्यांना वाईट वाटणारच. सत्ता गेली यापेक्षा आम्ही त्यांना सत्तेपासून दूर ठेवलं. आम्ही आमच्या कामावर लक्ष केंद्रीत केले असून त्यांनी आता बर्नोल घ्यावं असं मी सांगणार नाही. जे ट्रोल करत आहेत, त्यांच्याकडे लक्ष देता कामा नये. हातात मोबाइल आहे म्हणजे काहीतरी त्यांना करावं लागत आहे."