मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

'धर्माचं नाव न घेता पीडित अल्पसंख्याक म्हटलं असतं...'

CAAच्या मसुद्यात हिंदू, पारशी, शीख... अशाप्रकारे कोणत्याही धर्माचं नाव न घेता पीडित अल्पसंख्याक शब्द वापरा, असा सल्ला नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर काम करणाऱ्या संसदीय समितीला घटनातज्ञांनी दिला होता.
 
घटनातज्ज्ञ सुभाष कश्यप यांनी म्हटलं आहे की, "धर्माचं नाव घेण्याऐवजी फक्त पीडित अल्पसंख्याक म्हणावं असं मला वाटत होतं. असं म्हटलं असतं तरी याचा तोच अर्थ निघाला असता, जो आता निघतोय. मी हेच संसदेच्या संयुक्त समितीला सांगितलं होतं. धर्माचं नाव घेणं आवश्यक नाही, त्याशिवायही उद्देश साध्य करता येईल, असंही मी त्यांनी म्हटलं होतं."
 
आता हे कायद्यानं किंवा संसदीय दुरुस्ती करून साध्य करता येऊ शकतं, असं त्यांनी पुढे सांगितलं.