मंगळवार, 5 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नाशिक , शुक्रवार, 27 डिसेंबर 2019 (12:53 IST)

मुख्यमंत्र्यांकडून पीयूषच्या पाठीवर कौतुकाची थाप

Chief Minister praised Piyush's backlash
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने 1 एप्रिल 2019 रोजी नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमी (एनडीए) आणि नेव्हल अ‍ॅकॅडमीच्या अंतिम परीक्षेत देशात सोळाळ्या तर राज्यातून पहिल्या कमांकाचे स्थान पटकविणार्‍या नाशिकच्या पीयूष नामदेव थोरवे याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेत त्यांच्याकडून शुभेच्छा स्वीकारल्या. 
 
मुख्यमंत्रांनी पीयूषच्या गळ्यात हार घालत त्याच्या ठीवर कौतुकाची थाप दिली. लाखो विद्यार्थ्यांच टप्प्याने झालेल्या स्पर्धेतून अखेरच्या 447 यशस्वी विद्यार्थ्यांमध्येही पीयूष अग्रस्थानी राहिला. गतवर्षी हृदविकाराने पीयूषचे पितृछत्र हरपल्यानंतरही जिद्दीने अभ्यास करीत त्याने  एनडीए परीक्षेत यश मिळविले आहे. पीयषने उच्च मध्यमिक शिक्षण औरंगाबादच्या सर्व्हिस प्रिप्रेटरी इन्स्टिट्यूट येथून घेतले आहे. या यशानंतर नाशिक महापालिकेचवतीनेही महापौर रंजना भानसी व पदाधिकार्‍यांनी पीयूषचा त्याच्या राहत्या घरी जाऊन गौरव केला होता.