मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 26 डिसेंबर 2019 (17:39 IST)

पुणेः CME मध्ये दुर्घटना, 2 जवान ठार, 5 जखमी

पुण्यातील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगमध्ये (सीएमई) पूल बांधणीच्या सरावादरम्यान अपघात होऊन दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांना खडकी येथील लष्करी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
 
गुरूवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास जवान बॅली सस्पेन्शन ब्रिज लाँच करण्याचे प्रशिक्षण केले जात होते. या दरम्यान एका बाजुच्या ब्रिजचा टॉवर पडला. या अपघातात दोन जवानांचा मृत्यू झाला तर 5 जखमी झाल्याची बातमी आहे.