बुधवार, 7 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 26 डिसेंबर 2019 (16:33 IST)

धनंजुंडे राष्ट्रवादीचे तर पृथ्वीराज काँग्रेसचे प्रदेशाध्क्ष?

Dhananjunde Nationalist or Prithviraj Congress State
राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांना मंत्री झाल्यानंतर भगवानगडावर येण्यासाठी गडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी निमंत्रण दिले आहे. पण मुंडे यांचे मंत्रिपद हुकण्याची शक्यता आहे. कारण, त्यांच्या नावाला प्रदेशाध्क्षपदासाठी पसंती दिली जाऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, तर राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून निुयुक्त करणच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे.
 
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यापूर्वीच्या मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून दुसरा प्रदेशाध्यक्ष नियुक्त केली जाण्याची   दाट शक्यता आहे. त्यामुळे सभा गाजवणारे मुंडे यांच्या नावाला पक्षातील अनेकांची पसंती आहे. मुंडेंच्या नेतृत्वगुणांचा पक्षाच्या संघटनासाठी फायदा होऊ शकतो, असा अंदाज बांधला जात आहे. मुंडे यांची राष्ट्रवादीचे फायरब्रँड नेते म्हणून ओळख आहे. परळीतल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या लढाईत त्यांनी बाजी मारली आणि पहिल्यांदाच विधानसभा गाठली. त्मामुळे मंत्रिमंडळात त्यांचा समावेश हा निश्चित मानला जात होता. पण पक्ष मुंडे यांना वेगळीच
जबाबदारी देण्याची शक्ता आहे.
 
काँग्रेसच्या प्रदेशाध्क्षपदी पृथ्वीराज चव्हाण?
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेसकडून विमान प्रदेशाध्क्ष बाळासाहेब थोरात यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे काँग्रेस आता राज्याची  धुरा पृथ्वीराज चव्हाण यच्याकडे देण्याची शक्यता आहे. चव्हाण यांनी महाराष्ट्रात काँग्रेसचे नेतृत्व करावे, अशी इच्छा खुद्द काँग्रेस हायकामांडचीच
असल्याचे सांगितले जात आहे.