सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

राज्यमंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर?

संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच पार्श्र्वभूीवर मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यंमत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बैठक झाली. सुमारे दीड तास या दोन्ही नेत्यांत चर्चा झाली. या चर्चेचा तपशील मात्र गुलदस्त्यात आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकमत झाले असले तरी काँग्रेसकडून मंत्र्यांची यादी अद्याप निश्चित झालेली नसल्याने मंत्रिमंडळ विस्तार 24 डिसेंबर ऐवजी नाताळानंतर 27 किंवा 30 डिसेंबरला होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली. 
 
मुख्यंमत्री ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील बैठकीला काँग्रेसकडून कुणीही नेता नव्हता. काँग्रेसकडून मंत्रिपदी कुणाकुणाची वर्णी लावायची याचा अंतिम  निर्णय दिल्लीतील पक्षश्रेष्ठीच घेणार असल्याने मुख्यमत्र्यांसोबतची बैठक काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी तूर्त टाळलचे बोलले जात आहे. याबाबत एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याला विचारले असता, काँग्रेसकडून यादी आल्यानंतरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे या नेत्याने सांगितले. मुख्यमंत्री आणि पवार यच्यातील बैठकीबाबत गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजक शब्दांत प्रतिक्रिया दिली. बैठकीतील चर्चेचा तपशील न सांगता मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अधिकृत घोषणा मुख्यमंत्री करतील, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे शरद पवार यांनी आधीच एक विधान करून काँग्रेसमुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचे अप्रत्क्षपणे सांगितले आहे. राष्ट्रवादीची यादी तयार आहे का, असा प्रश्न विचारला असता, आमची यादी तयार व्हायला उशीर लागणार नाही. आम्हाला कुणाची परवानगी घेण्यासाठी कुठे जावे लागत नाही, असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला होता. दुसरीकडे काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने आमची यादी दिल्लीत ठरेल असे सांगितले. दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत बैठक होईल व त्या बैठकीत मंत्रिमंडळात काँग्रेसकडून कुणाची वर्णी लागणार, यवर अंतिम निर्णय होईल, असे हा नेता म्हणाला.
 
दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार नोव्हेंबर रोजी सत्तेत विराजान झाले. शिवतीर्थावर झालेल्या भव्यदिव्य शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यच्यासह तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोन अशा एकूण सहा मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथघेतली. त्यानंतर या सरकारला जवळपास एक महिना होत आला तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळेच या बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.