रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 11 जून 2019 (16:34 IST)

राज्य मंत्रिमंडळ विस्तारासाठी जोरदार हालचाली, उत्सुकता शिगेला

राज्य मंत्रिमंडळ विस्तारासाठी जोरदार हालचाली सुरु आहेत. अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख आणि कोणाला कोणतं मंत्रिपद देणार हे सर्व ठरलं आहे, मात्र सध्या ते सर्व गोपनीय ठेवण्यात येत आहे.
 
मंत्रिमंडळाबाबत सर्व निर्णय दिल्लीतूनच होत आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात 7 मंत्रिपद नव्याने दिली जाऊ शकतात. काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलेले जयदत्त क्षीरसागर, तसंच विजयसिंह किंवा रणजीतसिंह मोहिते पाटील यांना मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. विखे आणि क्षीरसागर यांना चांगली खाती मिळणार आहेत. तर 5 नविन खाती कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता आहे.