रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नागपूर , बुधवार, 18 डिसेंबर 2019 (13:53 IST)

मंत्रिमंडळ विस्तार 23 किंवा 24 डिसेंबरला?

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा शपथविधी 28 नोव्हेंबरला पार पडला. या शपथविधीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सात मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर हिवाळी अधिवेशनाच्या काही दिवस आधी सहा मं‍त्र्यांने तात्पुरते खातेवाटप 12 डिसेंबरला जाहीर झाले. मात्र तरीही मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याची उत्सुकता सर्वांना आहे.
 
येत्या 23 किंवा 24 डिसेंबरला महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना,काँग्रेस, राष्ट्रवादीचे प्रत्येकती सहा मंत्री 23 किंवा 24 तारखेला शपथ घेतील, अशी शक्यता आहे.
पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला मंत्रिपद मिळणार याकडे सर्वाचे लक्ष आहे.
 
संभाव्य यादी
शिवसेना
रामदास कदम, अनिल परब, सुनील प्रभू, दीपक केसरकर, उदय सामंत, तानाजी सावंत, गुलाबराव पाटील, आशिष जैस्वाल, संजय राठोड, सुहास कांदे.
काँग्रेस
अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, वर्षा गाकयवाड, यशोमती ठाकूर, सुनील केदार, सतेज
पाटील, के.सी. पाडवी, विश्र्वजित कदम.
राष्ट्रवादी
अजित पवार, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, नवाब मलिक, राजेश टोपे, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड.