बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 18 डिसेंबर 2019 (13:31 IST)

फडणवीस पराभव पचवू शकलेले नाहीत : चव्हाण

देवेंद्र फडणवीस आपला पराभव अजून पचवू शकलेले नाहीत, त्यामुळेच ते सभागृहात गोंधळ घालतात, अशी टीका काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. चव्हाण म्हणाले, फडणवीस हे विरोधी पक्षाचे नेते आहेत.
 
आपण विरोधी पक्षात बसलो आहोत हे सहन होत नाही. त्यांना सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणायचा होता हे स्पष्ट आहे. खरे तर त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला सांगायला हवे, की तेच सत्तेत असताना महापूर आला होता. च्वहाण एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.