शनिवार, 24 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नागपूर , मंगळवार, 17 डिसेंबर 2019 (13:19 IST)

भाजप आमदारांचे टोप्या घालून आंदोलन

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानावरून भाजपने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आक्रमक भूमिका घेतली. भाजप आमदारांनी 'मी पण सावरकर' असलेल्या टोप्या घालून विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर घोषणाबाजी केली. राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी त्यावेळी केली.  
 
विधानभवन परिसरात आंदोलन करणार्‍या भाजपला उत्तर देण्यासाठी काँग्रेस आदाराने एकट्याने हातात हा फलक घेऊन आंदोलन केले. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून नागपूर येथे प्रारंभ झाला आहे. पहिलच्या दिवशी राहुल गांधींच्या सावरकरांविरोधातील विधानावरुन येथे भाजप आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार प्रकाश गजभिये यांनी भाजपला उत्तर दिले आहे. हातात एक फलक घेऊन त्यांनी एकट्याने वेगळ्या पद्धतीने आंदोलन केले. दरम्यान, आंदोलन करणार्‍या भाजपला उत्तर देण्यासाठी आमदार गजभिये यांनी एकट्याने आंदोलन केले. यासाठी त्यांनी हातात एक छोटाफलक घेतला होता. त्यावर महात्मा गांधींचा खून मी केला. मी नथुराम गोडसे बोलतो. या देशात
माझेच विचार चालतील, असा मजकूर लिहिला होता. या फलकबाजीद्वारे त्यांनी भाजपला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या हातात फलक घेऊन एकट्याने आंदोलन करतानाचा फोटो व्हारल झाला असून त्याची  सर्वत्र चर्चा सुरु आहे.