गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , मंगळवार, 17 डिसेंबर 2019 (13:26 IST)

देशात आंदोलने सुरु असताना गृहमंत्री प्रचारात व्यस्त : सुळे

Home Minister engaged in campaigning during protests in country: Sule
दिल्लीतील परिस्थिती भयानक आहे. दिल्ली पोलीस केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली आहेत. गृहमंत्रालयाचे अजून एक अपयश आहे. दिल्लीत गंभीर प्रश्न असताना आंदोलने होत असताना, बस जळत असताना देशाचे जबाबदार व्यक्ती गृहमंत्री झारखंडच्या प्रचारात व्यस्त असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.  
 
पुण्यात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरून सध्या देशात सुरू असलेल्या वादावर विचारले असता सुळे म्हणाल्या, देशासाठी ज्यांनी योगदान दिले त्या सर्वांबद्दल आमच्या मनात सन्मान आहे. त्यामुळे समाजात तेढ निर्माण होईल, अशी भूमिका कोणी ही घेऊच नये. देशासमोर सध्या   बेरोजगारी हा गंभीर विषय आहे तवर चर्चा होणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या.