शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 14 मे 2019 (16:44 IST)

वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाला आठवडाभराची मुदतवाढ

राज्य सरकारने वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाला आठवडाभराची मुदतवाढ दिली आहे. १३ मे २०१९ पासून पुढचे सात दिवस प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. सुप्रीम कोर्ट आणि आणि उच्च न्यायालयांमध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकांचा विचार करता प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे.  २०१९-२० वर्षाच्या वैद्यकीय आणि दंत पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आरक्षण लागू करता येणार नाही असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. नागपूर खंडपीठाने जो निर्णय दिला होता तोच सुप्रीम कोर्टानेही कायम ठेवला. आता काय करायचे असा पेच विद्यार्थ्यांपुढे आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत निर्माण झालेल्या कायदेशीर बाबींमुळे पुढचे सात दिवस प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे असे राज्य शासनाने म्हटले आहे. पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी उमेदवारांनी किंवा पालकांनी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा विभागाच्या www.mahacet.org या संकेतस्थळाला भेट द्यावी असं आयुक्त सक्षम प्राधिकारी आनंद रायते यांनी स्पष्ट केले आहे.