शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 14 मे 2019 (16:41 IST)

'म्हणून' श्रावणीचा दुर्दैवी मृत्यू झाला

मुंबईच्या दादर पोलीस वसाहतीतील इमारतीला लागलेल्या आगमध्ये श्रावणी चव्हाण (१५) या मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला होता. आग लागवल्यावर श्रावणीच्या घरा बाहेर पडता आले नाही कारण तिच्या घराला बाहेरुन टाळा लावलेला होता. दरम्यान, पोलीस तपासामधून ही माहिती समोर आली आहे की, श्रावणीला घरी ठेवून तिचे आई वडील घराला टाळे लावून लग्नासाठी निघून गेले होते. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘घराला आग लागली त्यावेळी श्रावणी चव्हाण ही घरामध्ये झोपली होती. आग लागल्यानंतर तिला सुरक्षितरित्या घराबाहेर पडता आले नाही कारण तिच्या घराला बाहेरुन टाळे लावले होते. रविवारी श्रावणीचे आई-वडील लग्नासाठी गेले होते. श्रावणीने घरात बसून अभ्यास करावा यासाठी तिच्या आई-वडिलांनी घराला टाळे लावले होते.’