शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नागपूर , सोमवार, 23 डिसेंबर 2019 (15:41 IST)

नागरिकत्व कायदा धर्म, जातीच्या विरोधात नाही

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देशभर वातावरण पेटलेले असताना रविवारी नागपुरात या कायद्याच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. लोकाधिकार मंच आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसदेखील सामील झाले.
 
नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ संपूर्ण नागपूरकर एकजूट झाले आहेत. हा कायदा कुठल्या धर्माचा किंवा जातीच्या विरोधी जाणार नाही, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. काही राजकीय पक्ष आणि लोकांद्वारे या कामाबाबत समाजात गैरसज पसरविण्यात येत असल्याचा आरोप देखील फडणवीस यांनी केला. अशा अफवा आणि गैरसमज पसरवणार्‍याच्या निषेधार्थ नागपूरकर रस्त्यावर उतरले असल्याचे फडणवीसांनी सांगितले.
 
नागपूरच्या य शवंत स्टेडिम ते संविधान चौक अशी ही भव्य रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते. फडणवीस देखील या रॅलीत झाशीची राणी चौक ते संविधान चौकदरम्यान पायी चालले. यावेळी फडणवीस यांनी राणी लक्ष्मीबाई यच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीत सहभाग घेतला.
 
रॅलीमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी रॅलीत करण्यात आली. 'जागो जागो हिंदू जागो, 'घुसपैठियों जल्दी भागो', देश को बचना है, सीएए लाना है', अशा जोरदार घोषणा या रॅलीत देण्यात येत आहेत.