स्वकर्तृत्व नसलेले लोक जातीचं कार्ड वापरतात : नितीन गडकरी
राजकारणात अनेक लोकं जेव्हा स्वकर्तृत्वावर उमेदवारी मिळवण्यात अपयशी ठरतात तेव्हा ते जातीचं कार्ड समोर करतात, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सडेतोड मत व्यक्त केलं आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते.
हे लोक राजकारणात महिला आरक्षणाची मागणी करतात. मात्र इंदिरा गांधी, सुषमा स्वराज, वसुंधराराजे या महिला आरक्षणामुळे मोठ्या झाल्या नाहीत.
तसंच राजस्थानात अशोक गहलोत फक्त माळी समाजाच्या पाठिंब्याने नाही तर सर्व समाजाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाले असं देखील गडकरी यांनी म्हटलं आहे.
आज राजकारणात जातीमुळे नव्हे तर लोकांचं काम केल्यामुळे यश मिळतं आहे. मोदींनी कधीच त्यांची जात कोणाला सांगितली नाही, याची आठवणही गडकरींनी करून दिली.