सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण, आजचे दर जाणून घ्या
Gold Silver Rate Today : अलीकडेच सोनं चांदीच्या दरात वाढ होत आहे. सोनं चांदीचे दर गगनाला भिडले आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोनं चांदीचे दर कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
ALSO READ: Silver Price Today कालच्या घसरणीनंतर आज चांदीच्या किमतीत किंचित वाढ, १० फेब्रुवारीचा चांदीचा दर जाणून घ्या
ALSO READ: Silver Price Today कालच्या घसरणीनंतर आज चांदीच्या किमतीत किंचित वाढ, १० फेब्रुवारीचा चांदीचा दर जाणून घ्या
सध्या लग्नसराईचा हंगामा सुरु आहे. सध्या बाजारात मोठी अस्थिरता बघायला मिळत असून एके दिवशी दर वाढतात आणि दुसऱ्या दिवशी दर कमी होतात. या मुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक संभ्रमात आहे.
बुधवारी 24 कॅरेट सोनाच्या दरात वाढ होऊन जीएसटीसह सोनं चांदीचे दर प्रति 10 ग्रॅम 1,62,740 रुपये होते. त्या नंतर गुरुवारी 1,545 रुपयांनी घसरण झाली. आणि सोन्याचे दर 1,61,195 रुपयांवर पोहोचले. तर आज शुक्रवारी सकाळी बाजार उघडल्यावर दरात 2,575 रुपयांची घसरण झाली.आजचे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति 10 ग्रॅम 1,58,620 रुपयांपर्यंत घसरले.
सोन्यासह चांदीचे दरात देखील लक्षणीय घट झाली. बुधवारी चांदीचे दर प्रति किलो 2,78,100 रुपयांवर होते. दर गुरुवारी 5,150 रुपयांनी घसरण झाले. आजचे दर 2,72,960 रुपयांवर आले.
शुक्रवारी सकाळी चांदीचे दर घसरले असून आजचे दर 15,450 रुपये झाले. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रतिकिलो 2,57,500 रुपयांवर स्थिर झाले.
Edited By - Priya Dixit
