शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

CAA आंदोलनामुळे भारत असुरक्षित - जावेद मियादाद

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) आणि NRCवरून भारतात आंदोलन सुरू आहे. त्यामुळे भारतातील परिस्थिती चांगली नाही, असं वक्तव्य पाकिस्तानच्या क्रिकेट टीमचा माजी कर्णधार जावेद मियांदाद यांनी केलं आहे.
 
"पाकिस्तान नव्हे तर भारत सध्या असुरक्षित आहे. भारतात गेलेले पर्यटक असुरक्षित आहेत. माणूस म्हणून आपल्याला या विरोधात उभं राहायला हवं. तसंच भारतात जे काही सुरू आहे याचा विरोध करायला हवा. संपूर्ण जग पाहत आहे की, भारतात सध्या काय होत आहे. मी पाकिस्तानकडून बोलत आहे. मला वाटतं की, भारतासोबत सर्व खेळाचे संबंध तोडायला हवेत. सर्व देशांनी भारताविरुद्ध कडक पावलं उचलायला हवीत," असं ते म्हणाले.
 
"आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदनं (ICC) अन्य देशांतील क्रिकेट संघाना भारताचा दौरा करण्यापासून रोखावं, त्यांना भारतात खेळण्यासाठी पाठवू नये," असंही त्यांनी म्हटलं.
 
CAA: पंतप्रधान मोदी म्हणतात देशात डिटेन्शन सेंटर नाहीत पण...
दरम्यान, पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरिया हिंदू होता म्हणून त्याच्याशी भेदभाव झाला, या शोएब अख्तरच्या वक्तव्यावरून सध्या बरीच चर्चा होते आहे.
त्यावर बोलताना भारताचा माजी सलामीवीर आणि आता भाजप खासदार गौतम गंभीर म्हणाले, "हिंदू-मुस्लीम भेदभाव पाकिस्तानमध्ये केला जातो. भारतात सगळ्यांना समान वागणूक दिली जाते. मुस्लीम असूनही मोहम्मद अझरुद्दीन यांनी भारतीय क्रिकेट संघाचं कर्णधारपद भूषवलं आहे."