शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: आग्रा/अहदाबाद , मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020 (16:53 IST)

'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू

Preparation
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत दौर्‍यावर येत आहेत. 24 फेब्रुवारीला ते भारतात दाखल होतील. त्यांच्या स्वागतासाठी 'नमस्ते ट्रम्प' या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. या कार्यक्रमासाठी अनेक महत्त्वाच्या पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी उद्योपती मुकेश अंबानी, रतन टाटा, सुनील मित्तल, आनंद महिंद्रा आणि माजी क्रिकेटपटू कपिलदेव निखंज आणि सचिन तेंडुलकर हे उपस्थित राहणार आहेत. अमहदाबादमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. 
 
अहमदाबादमधील कार्यक्रमानंतर ट्रम्प हे पत्नीसोबत आग्रामधील ताजमहल बघायला जाणार आहेत. आग्रामध्ये ट्रम्प यांच्या भेटीसाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. आग्रा विमानतळापासून ते  ताजमहलपर्यंतच्या मार्गावर सौंदर्यींकरण आणि साफ-सफाईचे काम सुरू आहे. अमेरिकेच्या दूतावासमधील अधिकारी आग्रात दाखल झाले. त्यांनी तयारी आणि सुरक्षेचा आढावा घेतला.