मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मनसेची अधिवेशनासाठी जोरदार तयारी, नवे पोस्टर लाँच

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाअधिवेशानाचे अधिकृत पोस्टर लाँच करण्यात आले  आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती निमित्त 23 जानेवारीला मनसेचं पहिलचं अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. या अधिवेशनापूर्वी मनसेचे नवं पोस्टर समोर आलं आहे. यावर भगव्या रंगाचा महाराष्ट्र पाहायला मिळत आहे. 
 
यात चॉकलेटी रंगाच्या पृष्ठभागावर भगव्या रंगाचे महाराष्ट्र दिसतं आहे. यावर “विचार महाराष्ट्र धर्माचा, निर्धार हिंदवी स्वराज्याचा” असे लिहिले आहे.