मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 18 जानेवारी 2020 (09:31 IST)

मेगाभरती ही चूकच, चंद्रकांत पाटील यांनी दिली कबुली

विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपने केलेली मेगाभरती ही चूकच अशी कबुली भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. भाजपच्या मूळ संस्कृतीला मेगाभरतीचा फटका बसल्याचं देखील चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी चिंचवडमधील भाजपच्या मेळाव्यात कबुल केलं आहे. 
 
मेगाभरतीमुळे भाजपची संस्कृती थोडी बिघडली. भाजपची संस्कृती अशी नव्हती. हा पक्ष प्रेमावर चालतो. पण थोडा बदल झाला. जो काम करतो त्याला नाही तर तो आपल्या जवळ आहे त्याला पदं दिली गेलीत. हे कल्चर आता उद्धवस्त करावं लागणार आहे, असं देखील पाटील यावेळी बोलले.