गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 27 नोव्हेंबर 2019 (14:48 IST)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनी पुनरागमनाच्या तयारीत

In preparation for Dhoni's comeback in international cricket
2019 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान उपान्त्य ङ्खेरीत संपुष्टात आल्यानंतर महेंद्रसिंह धोनीने भारतीय संघातील आपले स्थान गावले आहे. आगामी टी-20 विश्वचषक आणि धोनीचे वाढते वय लक्षात घेता त्याच्या संघातील पुनरागमनाच्या शक्यता कमी झाल्या आहेत. मात्र, आगामी वर्षात धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसू शकतो. 
 
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आगामी वर्षात टी-20 सामनांचे आयोजन करण्याची तयारी दाखवली आहे. 18 आणि 21 मार्च 2020 रोजी ढाका शहरात हे सामने होणार आहेत. या सामन्यांसाठी भारतीय संघातील 7 खेळाडूंना परवानगी द्यावी, अशी मागणी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला केल्याचे समजते. या 7 भारतीय खेळाडूंमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि महेंद्रसिंह धोनी यांचा समावेश असल्याचे कळते. 
 
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने या सामन्यांचे आयोजन केले आहे. यासाठी आम्ही बीसीसीआय आणि इतर  आशियाई क्रिकेट बोर्डाच्या अधिकार्‍यांशी संपर्कात आहोत. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अधिकारी निझामुद्दीन चौधरी यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. 
 
याआधी 2007 साली धोनी या मालिकेत खेळला होता. त्यामुळे बीसीसीआय आता बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या विनंतीवर काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.