मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: कोलकाता , सोमवार, 25 नोव्हेंबर 2019 (12:03 IST)

आयसीसीच्या गुणतालिकेत भारताचे अव्वलस्थान कायम

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कोलकाता कसोटी सामन्यात बांगलादेशवर 1 डाव आणि 46 धावांनी मात केली. या विजयासह भारताने 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतही निर्भेळ यश संपादन केले. भारतीय संघाच्या या विजयामुळे त्यांचे आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील गुणतालिकेतील स्थान अधिक बळकट झाले आहे. भारत सध्या 360 गुणांसह पहिल्यास्थानावर आहे. भारताने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील 7 सामन्यांध्ये 7 विजय ळिवले आहेत. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील पहिल्या 3 क्रमांकाचे संघ पुढीलप्राणे
1) भारत : 7 सामन्यांत 7
विजय 360 गुण
2) ऑस्ट्रेलिया : 6 सामन्यात
3 विजय, 2 पराभव आणि 1
अनिर्णीत 116 गुण
3) न्यूझीलंड : 2 सामन्यात 1
विजय, 1 पराभव 60 गुण