रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: रांची , सोमवार, 18 नोव्हेंबर 2019 (14:48 IST)

क्रिकेटपासून दूरअसलेला धोनी 'गोल्फमध्ये' व्यस्त

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकापासूनच क्रिकेटपासून दूर आहे. एकीकडे धोनीच्या निवृत्तीची चर्चा होत असते, तर दुसरीकडे धोनी हा नेहमीच 'कूल' असतो. नुकताच धोनीचा एक फोटो समोर आला आहे, ज्यात तो केदार जाधव, माजी गोलंदाज आर. पी. सिंह यांच्यासोबत गोल्फ खेळताना दिसत आहे.
 
केदार जाधवने सोशल मीडियावर धोनीसोबतचा फोटो शेअर केला, ज्यात आर. पी. सिंह दिसत आहे. आर. पी. सिंहनेही या फोटोला रिट्विट केले आहे. जुन्या सहकार्‍यांसोबत वेळ घालवणे खेळापेक्षाही जास्त चांगले होते, असे आर.पी. सिंह म्हणाला. यापूर्वी धोनी त्याचे शहर रांचीमध्ये नेट प्रॅक्टिस करताना दिसत होता. त्यामुळे धोनी पुन्हा एकदा कमबॅकची तयारी करत असल्याचा अंदाज लावण्यात आला. विश्वचषकानंतर धोनीने सैन्यासोबतही वेळ घालवला होता. त्याने जम्मू काश्मीरमध्येही कर्तव्य बजावले होते.