सोमवार, 11 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020 (10:11 IST)

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण, शरद पवार यांना साक्ष देण्सायाठी बोलावणार

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना साक्ष देण्सायाठी बोलावण्यात येणार आहे . शरद पवारांनी अनेकदा माध्यमांसमोर भीमा कारेगाव प्रकरणात आपल्याकडे महत्त्वाची माहिती असल्याचं सांगितलं होतं. तसेच अनेक गंभीर आरोपही केले होते. त्यामुळे आता चौकशी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांनी या माहितीचा तपासात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
आयोगाचं चौकशीचं वेळापत्रक ठरलेलं नसलं, तरी शरद पवार यांना लवकरच साक्षीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता आहे. कारण चौकशी आयोगाला अल्पमुदतवाढ मिळाली आहे. केवळ तीन महिन्यांच्या मुदतवाढीपैकी आयोगाचा एक महिना संपत आला आहे. त्यामुळे पुढील महिन्यातच या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाचं कामकाज होऊ शकतं.
 
शरद पवार यांची साक्ष पुण्यात होणार असल्याची शक्यता आहे. पुढील महिन्यात मार्चमध्ये ही सुनावणी होईल. मोठा काळ ही सुनावणी चालेल. याच दरम्यान शरद पवार यांना साक्षीसाठी बोलावण्यात येणार आहे. यासाठी आगामी काही दिवसांमध्येच आयोगाकडून शरद पवार यांना साक्षीबाबत समन्स पाठवण्यात येईल.