1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. protest on vidhanbhavan stairs

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाले. यावेळीअधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन सुरु केले आहे. महिला अत्याचारास विविध मुद्यांवर विरोधकांनी सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणून सोडला आहे. 
 
आघाडी सरकारमधील तीन पक्षांतील मतभेदांचे मुद्दे उपस्थित करून सत्ताधार्‍यांना अडचणीत आणण्याची रणनीती भाजपने आखली असली, तरी त्याचा सामना करण्यासाठी आघाडीच्या नेत्यांनीही डावपेच तयार ठेवले आहेत. मात्र, ‘सीएए’, ‘एनआरसी’, ‘एनपीआर’, सावरकर अशा भावनिक मुद्द्यांवरच हे अधिवेशन गाजण्याची चिन्हे आहेत.
पुढील लेख
दरी-खोर्‍यातून नाद घुमू दे एकच दिनराती, मी मराठी...मी मराठी!