शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 24 फेब्रुवारी 2020 (17:53 IST)

सोशल मीडियावरही ट्रम्प यांचे जोरदार स्वागत

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं सोशल मीडियावरही धडाकेबाज अंदाजात स्वागत करण्यात आलं. 
 
#TrumpInIndia #NamasteyTrump असे हॅशटॅगही सोशल मीडियावर ट्रेंड करु लागले. ज्याअंतर्गत एकिकडे ट्रम्प यांच्या येण्याच्या बातम्यांनी जोर धरला तर, दुसरीकडे नेटकऱ्यांची कल्पकता विनोदी मीम्सच्या रुपात पाहायला मिळाली. ट्रम्प विमानतळावर पोहोचताच बाहेर रिक्षावाले त्यांना कसे बोलवतील इथपासून ट्रम्प यांचा अंदाज कसा असेल इथपर्यंत प्रत्येक गोष्टीवर भाष्य करत नेटकऱ्यांनी हे मीम्स पोस्ट करण्यास सुरुवात केली.