रविवार, 8 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020 (13:58 IST)

फक्त राहुल गांधी हेच काँग्रेसला वाचवू शकतात

काँग्रेसला उभारी देण्यासाठी पक्षाचा अध्यक्ष लोकशाही पद्धतीने निवडला पाहिजे असे माजी केंद्रीय  मंत्री शशी थरूर यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे मुंबईतील नेते संजय निरूपम यांनी संताप व्यक्त केला आहे. गांधी कुटुंबाशिवाय बाहेरील कुणीही नेता सध्याच्या घडीला काँग्रेसचे नेतृत्व करू शकत नाही. राहुल गांधी हेच पक्षाचे नेतृत्व करणारे आणि काँग्रेसला वाचवू शकतील असे एकमेव नेते आहेत, असे ते म्हणाले.
 
काँग्रेसला नवे अध्यक्ष मिळत नसल्याबद्दल दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित यांनी वरिष्ठ नेत्यांना जबाबदार धरले होते. त्यावर थरूर यांनीही प्रतिक्रिया दिली होती. पक्षाचा अध्यक्ष लोकशाही पद्धतीने निवडला जावा, असे ते म्हणाले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर निरूपम हे भडकले आहेत. राहुल हेच काँग्रेस पक्षाला वाचवू शकतात, असे ते म्हणाले. पक्षात सहा ते आठ जण असे आहेत जे नेतृत्त्व करण्यासाठी सक्षम आहेत. पण अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात टाकायची याची भीती वरिष्ठ नेत्यांना वाटत आहे, असे म्हणत त्यांनी वरिष्ठ नेत्यांवर निशाणा साधला.