शिवाजी महाराजांची मूर्ती जेसीबी लावून पाडली

shivaji maharaj statue
Last Modified गुरूवार, 13 फेब्रुवारी 2020 (15:48 IST)
मध्य प्रदेशातील छिंदवाडा परिसरात लागलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यात आली. या घटनेमुळे शिवप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. क्राँग्रेस सरकारवर हल्ला बोलत जनता रस्त्यावर उतरली आहे. दरम्यान, खासदार छत्रपती संभाजी राजेंनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या प्रकारावर खुलासा करावा, अशी मागणी केली आहे.

मध्य प्रदेश सरकारने जाणुबबुजून शिवाजींची मूर्ती हटवली असल्याचा आरोप होत आहे. संभाजी राजेंनी ट्विटवर म्हटले की छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती जेसीबी लावून पाडत असल्याचा व्हिडिओ पाहून मन हेलावून गेलं. मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकारने आणि काँग्रेस अध्यक्षांनी त्याबाबत खुलासा करावा. जनआक्रोश एवढा आहे की, त्याची झळ काँग्रेसला बसल्याशिवाय राहणार नाही. संभाजी राजेंनी यात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांना टॅग केले आहे.
मूर्ती काढावीच लागणार होती, तर त्याची पद्धत सन्मानजनक ही करता आली असती. असल्या क्रूर पद्धतीने हटवून तुम्ही नेमकं काय सिद्ध करू पाहत आहात? असे कृत्य छत्रपतींचा वंशज म्हणून कदापीही सहन करु शकत नाही. असा इशाराही त्यांनी दिला आहे.

भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील या घटनेवर ट्विटरवरून निषेध नोंदवला. छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्राचे गौरव आहेत आणि त्यांचा अपमान सहन केला जाणार नाही. तसेच सन्मानपूर्वक मार्गाने हा चौथरा हटवला आला असता परंतू मप्र सरकारला महापुरुषांचा अपमान करण्यात गर्व वाटतो असा आरोप देखील केला. शिवाजी महाराजांचा अपमान शिवसेनेला सहन होईल का? असा प्रश्‍न देखील मांडला.

मोहगावाच्या चौकात शासकीय जमिनीवर परवानगी न घेता मूर्ती लावण्यात आली होती म्हणून प्रशासनाने 24 तासांत मूर्ती हटवून कारवाई केली असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले परंतू सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायल झाल्यामुळे अनेक लोकांनी संताप व्यक्त केला आहे. नंतर शिवप्रेमींनीही रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध नोंदवत मोर्चा काढला. येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

यु.पी.एस.सी.चीच्या स्थगित केलेल्या मुलाखती २० जुलैपासून

यु.पी.एस.सी.चीच्या स्थगित केलेल्या मुलाखती २० जुलैपासून
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे विविध नागरी सेवांसाठी घेतली जाणारी २०२० साठीची पूर्व परीक्षा ...

ठरलं, अखेर आलं केंद्रीय लोकसेवा आयोगाच वेळापत्रक

ठरलं, अखेर आलं केंद्रीय लोकसेवा आयोगाच वेळापत्रक
करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं लॉकडाउनची घोषणा केली. त्यानंतर सर्वच काम ठप्प ...

गँगस्टर दाऊद इब्राहिमला करोनाची लागण

गँगस्टर दाऊद इब्राहिमला करोनाची लागण
गँगस्टर दाऊद इब्राहिमला करोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त येत आहे. दाऊदबरोबरच त्याच्या ...

चक्री वादळ गेले आता आला जीवनदायी असा मान्सून

चक्री वादळ गेले आता आला जीवनदायी असा मान्सून
बंगालच्या उपसागरात उठलेले अम्फान आणि अरबी समुद्रात उठलेले निसर्ग; ही दोन वादळे ...

कर्नाटकात 4.0 तर आणि झारखंडमध्ये 4.7 तीव्रतेसह भूकंपाचे ...

कर्नाटकात 4.0 तर आणि झारखंडमध्ये 4.7 तीव्रतेसह भूकंपाचे धक्के
आज सकाळी 06:55 वाजता कर्नाटकच्या हंपी येथे रिश्टर स्केलवर 4.0च्या तीव्रतेसह भूकंपाचे ...