मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

विकेंडला नवरा स्वयंपाक करेल, बायको बाहेर पडेल

मध्यप्रदेशाची राजधानी भोपाळ येथे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे ज्यात नवरा-बायको कायद्याने घरगुती काम वाटून घेण्यासाठी जिल्हा विधिक प्राधिकरण पोहचले.  100 रुपयांच्या स्टाम्प पेपरवर दंपतीने लिहिले की शनिवारी आणि रविवार म्हणजे विकेंडला नवरा घरातील काम करेल आणि बायको बाहेर पडेल. दोघांमधून एकही आजारी असल्यास हॉटेलमधून जेवण मागवण्यात येईल.
 
प्राधिकरणाने देखील त्यांच्यातील कराराचा सन्मान करत हे प्रकरण जिल्हा कोर्टात पाठवणार असल्याची माहिती दिली आहे. याने या कराराला कायदेशीर मान्यता मिळेल.
 
जिल्हा विधिक प्राधिकरणात आतापर्यंत महिला पती आणि सासरच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी येत होत्या. परंतू हे प्रकरण बघून सर्व हैराण आहे ज्याने आपसातील वाद स्वत: तयार केलेल्या काही नियमाने संपतील.
 
माहितीनुसार पती- पत्नी दोघे खासगी कंपनीत एक्झिक्यूटिव्ह पदावर आहे. दोघांचे लग्न 10 वर्षांपूर्वी झाले होते. परंतू घरातील कामांमुळे दोघांमध्ये वाद होत होता. हे वाद संपण्यासाठी त्यांनी आपसात काही अटी निर्धारित करून करार केला. हा करार तोडल्यास दोघांनी स्वत:साठी शिक्षा देखील ठरवली आहे.
 
या अटींप्रमाणे आठवड्यातून पाच दिवस पत्नी जेवण तयार करेल आणि घरगुती काम व मुलांचा होमवर्ककडे देखील लक्ष देईल. शनिवार आणि रविवार हेच कामं नवर्‍याला करावे लागतील. दोन्ही पक्ष एकमेकांच्या आई-वडिलासंबंधित टिप्पणी करणार नाही.
 
ऑफिसहून उशिरा घरी येण्याबाबद सूचना दोन तासापूर्वी द्यावी लागेल. ज्यामुळे दोघांमधून एक घरी पोहचून मुलांकडे लक्ष देऊ शकेल. दोघं आपल्या आई-वडिलांना भरणपोषणाची राशी आपल्या इच्छेप्रमाणे देऊ शकतील.
 
मुलांच्या भविष्यासाठी दोघेही आपल्या अकाउंटहून काही रक्कम जमा करतील. मुलांच्या शाळेतील पॅरेंट मीटिंग देखील नवरा-बायको एक-एक महिना अटेंड करतील. दोघांमधून कोणालाही प्रवासाला जायचं असल्यास याबद्दल 5 दिवसापूर्वी दुसर्‍याला सूचित करावं लागेल. घराचा खर्च दोघेही बरोबरीने वाटून घेतील. खरेदी केलेल्या घरावर संयुक्त रूपात दोघांचे किंवा मुलांचे नाव असतील.