1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: पुणे , सोमवार, 3 फेब्रुवारी 2020 (13:05 IST)

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दबावाखाली शिवसेना

Shiv Sena under pressure of Congress-NCP
नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी मोहिमेबाबत शिवसेनेची भूमिका अत्यंत कलुषित झाली आहे. बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून लावणार्‍या 'सीएए'- 'एनआरसी'चे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी समर्थन केले पाहिजे. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावामुळे ते भूमिका घेत नाहीत, अशी टीका केंद्री सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय  अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली.
 
बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका योग्य  असून ते सीएए, एनआरसीच्या पाठिंब्यासाठीच अप्रत्यक्षपणे मोर्चा काढत आहेत, अशा शब्दांत त्यांनी राज ठाकरेंचे अभिनंदन केले. कायदेशीर मार्गदर्शन केंद्राचे उद्‌घाटन आठवले यांच्या हस्ते झाले.