शनिवार, 1 एप्रिल 2023
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. शिवजयंती
Written By
Last Updated: शनिवार, 2 एप्रिल 2022 (22:43 IST)

शिवाजींची अग्निपरीक्षा: सिंहिणीचे दूध

समर्थ गुरु रामदास आपल्या सर्व शिष्यांमधून सर्वात जास्त प्रेम शिवाजी महाराजांवर करत असत. बाकीचे शिष्य विचार करत होते की कदाचित शिवाजीं राजे असल्याने हे जास्त प्रेम त्यांचा वर करत असत. शिष्यांच्या मनातील ही गोष्ट जाणून समर्थांनी त्यांचे गैर समज दूर करण्याचा विचार केला. 
 
एके दिवशी रामदास महाराज शिवाजी आणि आपल्या इतर शिष्यांसमवेत एका अरण्यातून जात असे. रात्री त्यांनी एका गुहेत आश्रय घेतले. सगळे निद्रासी असताना समर्थ जोराने विव्हळू लागले. शिष्यांनी विचारल्यास त्यांनी पोटातून कळ येण्याचे आणि पोट दुखत असल्याचे सांगितले. शिष्यांनी वेदना दूर करण्याचा उपाय विचारल्यास समर्थांनी उपाय सांगितल्यावर सर्व शिष्य मात्र हैराण होऊन एकमेकांना बघू लागले. कारण समर्थ म्हणाले की यावर सिंहिणीचे दूध हाच एक उपचार आहे. ढोंगी भक्त उपाय करणार तरी कसे. सर्व शांत होते.
 
परंतू हे ऐकून मनात कुठलीही शंका किंवा भीती न बाळगता शिवाजी महाराज गुरुजींचा तुंबा घेऊन सिंहिणीच्या दुधाच्या शोधात निघाले. चालत असताना त्यांना एका गुहेत सिंहिणीची गर्जना ऐकू येऊ लागली. त्या गुहेत गेल्यावर त्यांना दिसले की एक सिंहिणी आपल्या लेकरांना दूध पाजत आहे. ते बघून त्यांनी त्या सिंहिणीस हात जोडून विनवणी केली "माते मी आपणांस  किंवा आपल्या शावकांना मारण्यासाठी आलो नसून माझे गुरु आजारी आहे आणि त्यांना आपलेच दूध बरं करू शकतं आणि मी केवळ ते घेण्यासाठीच येथे आलो आहोत. आपल्यास वाटले तर आपण माझ्या गुरुंना बरं वाटल्यावर माझे भक्षण करू शकता. 
 
आपल्या गुरु बद्दल आदर आणि भक्ती बघून सिंहिणी महाराजांपुढे नतमस्तक होऊ गेली. तिने त्यांना गयावया करून त्याचे पाय चाटण्यास सुरू केले. तेव्हा सिंहिणीस नमन करून राजेंनी तुंब दुधाने भरून आपल्या गुरुंकडे परतले.   
 
सिंहिणीचे दूध बघतास समर्थ म्हणाले- धन्य आहे शिवबा अखेरीस आपण सिंहिणीचे दूध आणलेच मी तर आपल्या सगळ्यांची परीक्षा घेत होतो. पोट दुखणे तर निव्वळ बहाणे होते. मी आपल्या सगळ्यांची परीक्षा घेत होतो. शिवबा सारखा शूर ज्याचा बरोबर आहे त्याला कोणतीही विपत्ती स्पर्श करू शकत नाही. 
 
तात्पर्य: जे आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ असतो त्याला देव पण साहाय्य करतात.