रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: रविवार, 27 फेब्रुवारी 2022 (17:09 IST)

हे मंदिर वर्षभर बंदच राहते, विशेष प्रसंगी कपाट फक्त 12 तास उघडतात, नक्की भेट द्या

भारतात अशे अनेक मंदिर आहे जे विस्मयकारक आहे. देवभूमी उत्तराखंडात असे अनेक अद्भुत आणि चमत्कारी मंदिर आहेत . त्यापैकी एक मंदिर चमोली येथील बंशी नारायण मंदिर आहे. हे मंदिर सुंदर डोंगराच्या मधोमध वसलेले आहे. हे विशेष मंदिर वर्षभर बंद असते. आणि एका विशेष प्रसंगी केवळ 12 तासांसाठीच भाविकांसाठी उघडे असते. चला तर मग या मंदिराबद्दल जाणून घेऊ या. 
 
बंशी नारायण मंदिर उत्तराखंडमधील चमोली येथे आहे. हे मंदिर खूप लोकप्रिय आहे. हे मंदिर वर्षभर बंद राहिल्याने भाविकांना वर्षभर दर्शन घेता येत नाही. मात्र, मंदिराचे कपाट विशिष्ट दिवशी केवळ 12 तासांसाठीच उघडले जातात. ज्या दिवशी मंदिराचे कपाट उघडतात त्या दिवशी भाविकांची गर्दी होते. या दिवशी लोक येथे प्रार्थना करतात आणि भगवान बंशी नारायण यांचा आशीर्वाद घेतात.
 
चमोली येथील बंशी नारायण मंदिराचे कपाट केवळ रक्षाबंधनाच्या दिवशीच भाविकांसाठी खुले असतात. या दिवशी जोपर्यंत सूर्यप्रकाश असतो तोपर्यंत मंदिर खुले असते. सूर्यास्ताच्या वेळी मंदिराचे कपाट बंद केले जातात. पहाटेपासूनच दूर-दूरवरून भाविक मंदिराच्या दर्शनासाठी येण्यास सुरुवात करतात आणि मंदिराचे कपाट उघडण्याची आतुरतेने वाट पाहतात.
 
बंशी नारायण मंदिराशी संबंधित कथा
हे मंदिर भगवान विष्णूचे आहे. वामन अवतारापासून मुक्ती मिळाल्यानंतर विष्णू प्रथम या ठिकाणी आले असे मानले जाते. तेव्हा नारद ऋषींनी येथे भगवान नारायणाची पूजा केली होती. त्यामुळे मानवाला देवाचे दर्शन घेण्यासाठी हे मंदिर केवळ एक दिवसासाठी उघडले जाते, अशी आख्यायिका आहे.
 
रक्षाबंधनाशी संबंधित एक अजून आख्यायिका आहे. एकदा राजा बळीने भगवान विष्णूंना आपला द्वारपाल बनण्याची विनंती केली. देवाने विनंती मान्य केली आणि ते  राजा बळीसोबत अधोलोकात गेले. बरेच दिवस देवी लक्ष्मीला भगवान विष्णू कुठेच सापडले नाहीत, तेव्हा तिने नारदांच्या आज्ञेनुसार श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला राजा बळी ला संरक्षक धागा बांधून भगवान विष्णूंना मुक्त करण्याची विनंती केली. त्यानंतर राजा बळीने विष्णूसह माता लक्ष्मीची या ठिकाणी भेट घेतली.
 
नंतर पांडवांनी या ठिकाणी मंदिर बांधले असे मानले जाते. रक्षाबंधनाच्या दिवशी मंदिरात येणाऱ्या महिला वंशीनारायण यांना राखी बांधतात. या मंदिराजवळ दुर्मिळ प्रजातीची फुले व झाडे पाहायला मिळतात. येथील दृश्य विलोभनीय आहे.