रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 21 मार्च 2022 (14:15 IST)

शिवजयंती निमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिली शपथ

राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. राज्यात विविध भागात शिवजयंती निमित्त कार्यक्रम आणि मिरवणुका आयोजित केल्या जात आहे. तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यासाठी मनसेने मुंबईतील शिवाजी पार्कात भव्य सोहळ्याचे आयोजन केले आहे. ढोल ताशांच्या गजरात शिवजयंती साजरी होत आहे . मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईच्या शिवाजी पार्क येथे शिवजयंतीच्या सोहळ्याला उपस्थित राहून हेलिकॉप्टरने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी केली. या प्रसंगी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदूंन मनसे कार्यकर्त्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देत  महाराष्ट्रात सुराज्य स्थापन करण्याची शपथ दिली . या शपथेमधील मजकूर सद्य स्थितीच्या मुद्द्यांना स्पर्श करणारा होता.  

ते म्हणाले- आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्त शपथ घेतो की राज्यात सुराज्य स्थापित व्हावं या साठी प्रयत्न करू, राज्यात महिलांच्या सुरक्षिततेची त्यांच्या आत्मसन्मानाचे रक्षण व्हावे, युवकांना रोजगार मिळावा, नागरिकांना योग्य आरोग्य व्यवस्था मिळावी, भ्रष्टाचाराचा नायनाट होईल, शहर, गाव , सुंदर आणि सुरक्षित असावी, शेतकरी बांधवाना योग्य भाव मिळावा. राज्यातील प्रत्येक मुलांनी शाळेत जाऊन शिकावं. यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहू आणि या ती जे काही करावं लागेल ते करू. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून त्यांचे स्वाभिमानी, स्वावलंबी राज्य होण्याचे स्वपन पूर्ण करू. आम्ही महाराष्ट्र धर्मासाठी एकनिष्ठेने कार्य करू.