1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : रविवार, 2 ऑक्टोबर 2022 (20:11 IST)

रंगपंचमीच्या फुग्याने घेतला जीव

Rangpanchami balloon took life
फुगे मारण्यावर बंदी असतानाही होळीच्यादिवशी अनेकजण रस्त्यावर जाणाऱ्यांना फुगे मारून आपला आनंद साजरा करत असतात. पण त्यामुळे अनेकांना दुर्घटनेचे बळी व्हावे लागत आहे. अशीच एका घटना गुरुवारी आगाशी चाळपेठ परिसरात घडली आहे.
 
विरार पश्चिम आगाशी येथे धूळवडीसाठी वापरला जाणारा फुगा लागल्यानं दुचाकी आणि सायकलस्वाराचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. यात सायकलवरील 54 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. अर्नाळा पोलिसांनी दुचाकी चालकांना ताब्यात घेतलं आहे.
 
विरारमधील आगाशी चाळपेठ परिसरात बूट पॉलिशचं दुकान बंद करून होळी सण साजरा करण्यासाठी घरी चाललेले रामचंद्र हरिनाथ पटेल हे या घटनेचे बळी ठरले आहेत.