सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 17 मार्च 2022 (15:27 IST)

मुंबईकर उष्णतेमुळे हैराण झाले, आरोग्य सांभाळण्याचे आवाहन

मुंबईकर उष्णतेच्या लाटेनं हैराण झाले आहेत. बदलत्या ऋतूमानानुसार होळीनंतर उन्हाळा आणखी तापदायक ठरण्याची दाट शक्यता आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे दाखल झालेल्या उष्णतेच्या लाटेनं मुंबईच्या कमाल तापमानात सातत्याने भर घातली आहेत. त्यामुळे मुंबईकर हैराण झाले असून आरोग्य सांभाळा असं आवाहन करण्यात आल आहे.
 
विदर्भात मार्च महिन्यात होळीपूर्वीच सूर्यनारायणचा तडाखा जाणवू लागलाय. विदर्भात सर्वाधिक तापमान अकोल्यात 42.9 अंश सेल्शिअस नोंदवण्यात आलं. अमरावती, वाशिम, वर्धा इथं 41 अंशांवर पारा गेला. नागपुरात 40.9 अंश सेल्सिअस तापमान होतं. अकोल्यात मार्च महिन्यापासूनच उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. ((विदर्भात तापमानाचा पारा जवळपास ४० अंशापर्यंत पोहचला आहे. अकोल्यात सुद्धा उन्हाची तीव्रता जाणवत आहेमार्च महिन्यात पारा ४३ पर्यंत पोहचल्याने अकोलेकरांची चिंता वाढली आहे.
 
विदर्भातील तापमान 38 ते 39 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेच्या मोठ्या झळा नागरिकांना बसतायेत. या तापमानापासून बचावासाठी नागरिक शीतपेयांकडे वळतायेत. नागरीकांनी विशेष काळजी घ्यावी असं आवाहन हवामान विभागानं केलंय.