निलेश राणे यांनी टविट करून खोचक टोला
निलेश राणे यांनी टविट करून खोचक टोला लगावला आहे. “मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. आता काय स्वत: दाऊदने फोन करून सांगावं राष्ट्रवादीवाल्यांना की त्यांचा राजीनामा घ्या?”असा सवाल निलेश राणेंनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्य सरकरावर टीकास्त्र सोडलं आहे. “कालपर्यंत तुम्ही सभागृहात सांगत होतात की नवाब मलिक यांच्याबद्दल उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. आज उच्च न्यायालयाने म्हटलं आहे की ईडीची कारवाई योग्य आहे. आता माझा सवाल आहे की बॉम्बस्फोटाचा आरोपी आणि दाऊदच्या माणसासाबोत संगनमत करून आर्थिक गैरव्यवहार करणारे मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा सरकार कधी घेणार? आता त्यांचा राजीनामा घेतला नाही तर हे स्पष्ट आहे की हे सरकार दाऊदच्या दबावाखाली काम करतंय”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.