सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 21 मार्च 2022 (11:34 IST)

राज्यभरात शिवजयंती उत्साहात साजरी

राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती उत्साहात साजरी करण्यात येत आहे. शिवजयंती निमित्त राज्यात विविध भागांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुकांचे आयोजन केले जात आहे .राज्यभरात शिवजयंतीसाठी लोकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती साजरी करण्याचे आदेश दिले आहेत. मनसेकडून मुंबईच्या शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टर मधून राज ठाकरे आणि अमित ठाकरे पुष्पवर्षा करणार आहे. या पूर्वी राज्यात 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी केली होती. आज 21 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती तिथीनुसार उत्साहात साजरी केली जात आहे.