गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 21 मार्च 2022 (09:47 IST)

“आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ कोण घेते, पवार सरकार”

Shivsena mp gajanan kirtikar said ncp is take advantage of thackeray government “आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ कोण घेते
“आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ कोण घेते, पवार सरकार” असे म्हणत शिवसेनेचे मुंबईतील खासदार व शिवसेनेचे नेते गजानन किर्तीकर यांनी निधी वाटपाबाबत नाराजी व्यक्त करत महाविकास आघाडीला सरकारला घरचा आहेर दिल्याने खळबळ उडाली आहे. 
 
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील शिर्दे येथे ब्राह्मणवाडी ते कोळबांद्रे रस्त्याच्या डांबरीकरण कामाच्या भूमिपूजन करण्यात आलं. या समारंभात किर्तीकर बोलत होते. 
 
"एका आमदाराला त्याच्या मतदार संघात विकास कामासाठी शासनाकडून निधी मिळविण्यासाठी मोठे प्रयत्न करावे पाहावे लागते, विकास कामांच्या निधीमध्ये पळवापळव केली जात असून ग्रामविकास मंत्रालयाच्या २५ /१५ योजनेमधून निधी मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळते.  आम्हाला मुंबईमध्ये हा प्रश्न उद्भवत नाही, मुंबईमध्ये नागरोत्थान, नगरविकासचा निधी मिळतो, मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून आम्ही निधी मिळवतो, मात्र निधीची पळवापळवी केली जात असून “ आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ कोण घेतो, पवार सरकार” असे म्हणत त्यांनी निधी वाटपात शिवसेनेवर अन्याय होत असल्याने नाराजी व्यक्त केली.