शनिवार, 6 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 21 मार्च 2022 (09:55 IST)

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक, सत्यजित कदम यांना भाजपाची उमेदवारी,निवडणूक प्रभारींची प्रदेशाध्यक्षांकडून नियुक्ती

Kolhapur North Assembly by-election
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे सत्यजित (नाना) शिवाजीराव कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक समितीतर्फे हा निर्णय घेण्यात आला.
 
भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी या निवडणुकीसाठी केलेल्या नियुक्त्यांनुसार भाजपाचे कोल्हापूर महानगर जिल्हा अध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक लढविण्यात येणार आहे. प्रदेशाकडून निवडणूक प्रभारी म्हणून माजी खासदार धनंजय महाडिक आणि निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून महेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक संचालन समिती नियुक्त करण्याचे अधिकार या तीन नेत्यांना देण्यात आले आहेत.