राज्यात या 12 जिल्ह्यात सरी बरसणार
सध्या सर्वत्र उकाडा वाढत असून तापमानात वाढ होत आहे. मार्चच्या महिन्यात चक्रीवादळाची स्थिती बंगालच्या उपमहासागरात निर्माण झाली असून राज्यात तापमानात घट होऊन पावसाचं वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या आग्नेय बंगालच्या उपसागरात आणि लगतच्या दक्षिण अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्ष्रेत्र बनत आहे. हवेचे कमी दाबाचे क्षेत्र बांगलादेश -उत्तर म्यांनमारच्या दिशेने पुढे सरकत असून आसनी चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा धोका भारतीय किनार पट्टीला नाही. तरी ही वातावरणात घट होऊन राज्यात कोकण आणि घाटात आणि मध्य महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार झाले आहे.
पुण्यासह, मुंबई, दुर्ग, पालघर, नाशिक, ठाणे, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, रायगड या भागात हवामान खात्यानं पावसाची शक्यता वर्तवली आहे. सध्या प्रचंड उकाडा जाणवत आहे. त्या मुळे या जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असून या भागात उष्णतेमुळे काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.