एमआयएमला महाविकास आघाडीत सामावून घेण्याबाबत नाना पटोलेंच सूचक वक्तव्य
एआयएमआयएम अर्थात 'ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादूल मुसलमीन'चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांनी शनिवारी महाविकास आघाडीत सामील होण्यास तयार असून, तसा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री राजेश टोपे यांच्यासमोर मांडल्यांचं सांगितलं. त्यावरून राज्यात चर्चांना उधाण आलं आहे.
राजकीय वर्तुळात ही उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या. यावर भाजपने शिवसेनेवर निशाणा साधला. तर शिवसेनेने एमआयएमला भाजपची 'बी टीम' म्हटलं. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी एमआयएमच्या या भूमिकेचं स्वागत केलं. यातच आता महाविकास आघाडीचा सदस्य असलेल्या काँग्रेसनंही सकारात्मक भूमिका मांडली.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एमआयएमला महाविकास आघाडीत सामावून घेण्याबाबत सूचक विधान केलं आहे
एमआयएमच्या भूमिकेबद्दल बोलताना नाना पटोले म्हणाले, "एमआयएमचा प्रस्ताव अद्याप कांग्रेसला आला नाही. आल्यावर विचार करू. इम्तियाज जलील यांचा प्रस्ताव काय आहे? त्यांचं मत काय आहे, हे जाणून घेऊ त्यांचं मत सेक्युलर व काँग्रेस विचारांशी सहमत असेल, तर नक्कीच विचार केला जाईल."