देवघर येथील रस्ते अपघाताबद्दल पंतप्रधान मोदींनी दुःख व्यक्त केले
देवघर येथे झालेल्या भीषण रस्ते अपघातात बस चालकासह 18 जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल मृतांच्या कुटुंबियांना शोकसंवेदना व्यक्त केल्या आहे.
मिळालेल्या माहितीनुसार झारखंडमधील देवघर येथे आज सकाळी झालेल्या भीषण रस्ते अपघातात बस चालकासह 18 जणांचा मृत्यू झाला आहे, तर २१ हून अधिक भाविक गंभीर जखमी झाले आहे. या दुःखद घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भीषण रस्ते अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे आणि मृतांच्या कुटुंबियांना सांत्वन व्यक्त केले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ही माहिती दिली. देवघर येथील अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "झारखंडमधील देवघर येथील रस्ते अपघात अत्यंत दुःखद आहे. यामध्ये जीव गमावलेल्या भाविकांच्या कुटुंबियांना माझ्या मनापासून सहानुभूती आहे. देव त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. यासोबतच, मी सर्व जखमींच्या लवकर प्रकृतीत सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो."झारखंड के देवघर में हुई सड़क दुर्घटना अत्यंत दुखद है। इसमें जिन श्रद्धालुओं को अपनी जान गंवानी पड़ी है, उनके परिजनों के प्रति मेरी गहरी शोक-संवेदनाएं। ईश्वर उन्हें इस पीड़ा को सहने की शक्ति दे। इसके साथ ही मैं सभी घायलों के जल्द से जल्द स्वस्थ होने की कामना करता हूं: PM…
— PMO India (@PMOIndia) July 29, 2025
Edited By- Dhanashri Naik